Skip navigation.
Home
  • ग्रंथालय संचालनालय

    महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम, 1967 ची अंमलबजावणी करण्याकरिता या अधिनियमातील तरतुदीनुसार "ग्रंथालय संचालनालय" या स्वतंत्र विभागाची स्थापना करण्यात आली आहे. या अधिनियमातील तरतुदीनुसार सार्वजनिक ग्रंथालय पद्धती प्रस्थापित करण्याकरिता सार्वजनिक ग्रंथालयांची स्थापना, परिरक्षण, संघटन, नियोजन आणि विकास यांची जबाबदारी ग्रंथालय संचालनालयाकडे सोपविण्यात आली आहे. राज्य शासनाची देखरेख, निर्देशन आणि नियंत्रण यास आधीन राहून अधिनियमाची अंमलबजावणी करण्याकरिता "ग्रंथालय संचालक" यांना विभागप्रमुख म्हणून नेमण्यात आले आहे.

  • संचालनालयांतर्गत शासकीय ग्रंथालये सेवा

    महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम, 1967 मधील तरतुदीनुसार शासनाच्या अधिपत्याखाली राज्य मध्यवर्ती ग्रंथालय आणि शासकीय विभागीय ग्रंथालये व आवश्यकतेनुसार अन्य जसे विशेष संदर्भ वा जिल्हा ग्रंथालये स्थापन करण्याची तरतूद आहे. राज्याच्या सार्वजनिक ग्रंथालय पद्धतीच्या नियंत्रणासाठी स्थापन करण्यात आलेली ही ग्रंथालये राज्यातील नागरिकांना राज्य, विभाग, जिल्हा स्तरावर विनामूल्य ग्रंथालय सेवा देत आहेत.

  • राज्य मध्यवर्ती ग्रंथालय

    राज्याच्या सार्वजनिक ग्रंथालय पद्धतीची शिखर संस्था म्हणून भूतपूर्व मुंबई सरकारच्या काळात मुंबई ग्रंथालय विकास समितीच्या (फैजी समिती) शिफारसीनुसार राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाचा दर्जा 1947 मध्ये देण्यात आलेले हे मध्यवर्ती ग्रंथालय करारान्वये एशियाटिक सोसायटीकडे चालविण्यासाठी सुपूर्द केले होते ते दि. 1/07/1994 पासून एशियाटिक सोसायटीच्या व्यवस्थापनाकडून शासनाने स्वतःच्या ताब्यात घेतले आहे व राज्य मध्यवर्ती ग्रंथालय म्हणून कार्यरत आहे. ग्रंथ प्रदान कायदा, 1954 (Delivery of Books Act, 1954) अन्वये भारतात प्रकाशित होणारे सर्व भाषेतील ग्रंथ व नियतकालिके प्रकाशकांतर्फे या ग्रंथालयास प्राप्त होतात.

  • शासकीय विभागीय ग्रंथालये

    राज्याच्या प्रत्येक महसूली विभागासाठी एक शासकीय विभागीय ग्रंथालय शासनाने स्थापन केले आहे. अमरावती, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, पुणे, रत्नागिरी या जिल्ह्याच्या मुख्यालयांमध्ये ही ग्रंथालये स्थापन करण्यात आली आहेत. मुद्रण व ग्रंथ नोंदणी कायदा, 1867 अन्वये मुद्रकांतर्फे पाठविण्यात येणार्‍या मराठी ग्रंथांचा संग्रह पुणे आणि नागपूर येथे केला जातो. या संग्रहासह स्पर्धा परीक्षा ग्रंथ, संदर्भ ग्रंथ इत्यादी साहित्याचा लाभ अभ्यासक, संशोधक यांना या ग्रंथालयांमधून विनामूल्य घेता येतो.याशिवाय 500 रु. अनामत व 150 रु.

  • शासकीय जिल्हा ग्रंथालये

    भारत सरकारच्या ग्रंथालय विकास योजनेअंतर्गत 1955 मध्ये तत्कालीन मध्यप्रांतामधील विदर्भाच्या आठ जिल्ह्यांमध्ये शासकीय जिल्हा ग्रंथालये स्थापन करण्यात आली. राज्य पुनर्रचनेनंतर 1956 मध्ये विदर्भ भाग तत्कालीन मुंबई राज्यात समाविष्ट करण्यात आल्यानंतर ती योजनाही तशीच सुरू ठेवण्यात आली. यापैकी अमरावती येथील शासकीय जिल्हा ग्रंथालयाचे उन्नतीकरण करून दि. 1/11/1996 पासून तेथे शासकीय विभागीय ग्रंथालय सुरू करण्यात आले.

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती ग्रंथालय, दापोली जि. रत्नागिरी


    कोकण विकासाच्या 40 कलमी कार्यक्रमांतर्गत असलेल्या 32व्या कलमानुसार दापोली येथे दि. 1/11/1996 पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती ग्रंथालय स्थापन करण्यात आले आहे. शासकीय विभागीय ग्रंथालयाच्या कार्यपद्धतीप्रमाणे हे ग्रंथालय नागरिकांना, संशोधकांना, अभ्यासकांना विनामूल्य ग्रंथालय सेवा उपलब्ध करून देत आहे.




    ---